Popular Posts

Friday, January 20, 2012

म टा मधील नोंदीने छाती फुगली

म टा मधील नोंदीने  छाती फुगली 
            काव्याग्रह प्रकाशन वाशीमच्या  विष्णू जोशी यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या 'इथे पेटली माणूस- गात्रे' या काव्यसंग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार प्राप्त झाला त्या निमित्ताने म टा ने २० जानेवारी २०१२ च्या अंकात जी विशेष नोंद घेतली त्या मुळे माझी छाती  अभिमानाने फुलली.
      माझा कडूनच इतकी वर्षे उपेक्षित राहिलेली माझी कविता इतकी मोलाची  असेल ,असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत. ही कविता प्रकाशात आणणारे काव्याग्रहचे विष्णू जोशी, विठ्ठल जोशी ,तिला पुरस्कृत करणारी सहकार महर्षी मोहिते पाटील पुरस्कार समिती आणि या सगळ्यांची आवर्जून दाखल घेणाऱ्या म टा सह
महाराष्ट्रतील असंख्य  दैनिकांचा मी सदैव ऋणी राहीन .
        या संग्रहास श्री चक्रधर स्वामी वाचनालय शेवाळा(बाळापूर)तालुका कळमनुरी,जिल्हा हिंगोली यांचा मानाचा पुरस्कारही   जाहीर झाला आहे .

MAHARASHTRA TIMES CHI VISHESH NOND

माणसं 


गो. आ. भट
21 Jan, 2012, 0503 hrs IST, 
गो. आ. भट हे जातिवंत पत्रकार होते. प्रदीर्घ काळ महाराष्ट्र टाइम्समध्ये काम केलेल्या गो. आ. भटांकडे पत्रकाराकडे हव्यात अशा गोष्टी उदंड होत्या.

बाबाराव मुसळेबाबाराव मुसळे
21 Jan, 2012, 0501 hrs IST, 
बाबाराव मुसळे हे नाव मराठी साहित्य विश्वाला नवं नाही. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली.


बाबाराव मुसळे
21 Jan 2012, 0501 hrs IST
 
 प्रिंट  मेल  शेअर  सेव  प्रतिक्रिया फॉन्ट:

बाबाराव मुसळे हे नाव मराठी साहित्य विश्वाला नवं नाही. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली.

'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी 'पखाल'चं विशेष कौतुक केलं होतं. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झुंगु लुखू लुखू', 'मोहोरलेला चंद', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश' या कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या तर 'वारुळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात हलचल निर्माण केली. मात्र एव्हाना वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा मानाचा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चचेर्त आले.

खरंतर बाबाराव मुसळे यांच्यासाठी पुरस्कार आणि प्रसिद्धी नवी नाही. मात्र गेली अनेक वर्षं कादंबरी-कथा प्रांतात जोरकस मुशाफिरी करणाऱ्या मुसळे यांचं कवीतिक अंग आजवर रसिकांना फारसे उमगलेले नव्हते. वास्तविक कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची ही कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होत होती. मात्र ती आजवर पुस्तकरूपाने प्रकाशात न आल्यामुळे वाचक तीपासून अनभिज्ञ होते. परंतु 'काव्याग्रह प्रकाशन'च्या विष्णू जोशी यांनी अलीकडेच मुसळे यांच्या कवितेला प्रकाशनाची वाट दाखवली आणि या कवितेने कवितेचा गाभारा लख्खपणे उजळून टाकला.

मुसळे यांच्या गद्य लेखनावर यशस्वीतेची मोहोर उमटलेली होतीच. परंतु त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहालाही मानाचा साहित्यिक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी कवी म्हणूनही आता स्वत:ला सिद्ध केलं आहे. अर्थात हा त्यांच्या कवितेचा आणि त्यांनी त्या कवितेतून जो मानवतेचा धर्म जागवलाय त्याचा गौरव आहे. कारण त्यांची कविता केवळ स्वत:चं दु:ख जागवत नाही. ती समोरच्याचं दु:ख पाहूनही तेवढीच व्याकुळ होते. प्रसंगी पेटून उठते. एकूण मुसळे यांची कविता ही माणुसकीची कविता आहे आणि त्यांच्या कवितेचा झालेला गौरव हा माणुसकीचा गौरव आहे.