Popular Posts

Monday, February 9, 2015

माझ्या विषयी महत्वाची माहिती- लक्षात घ्या.

I
या ब्लॉगला भेट देणाऱ्या मित्रांनो,
आपल्या साठी महत्वाची सूचना
***********************
या ब्लॉगवर आपण भेट दिली असता आपणास माझ्या बद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नसल्याने आपण नक्कीच निनिराश होत असाल. निराशा टाळण्यायासाठी आपण माझ्या  itthambhutbabaraomusale@blogspot या ब्लॉगला भेट द्या.


Itthambhutbabaraomusale@blogspot या ब्लॉगवर मी माझ्या कथा कादंबर्‍या वरील परीक्षणे, संपूर्ण कविता संग्रह, पखाल या कादंबरीवर आधारित नाटक, इतरांच्या कथा कादंबर्‍या, कविता, चरित्रे. आत्मचरित्रे या वर मी लिहिलेले प्रकाशित अप्रकाशित समीक्षा लेख, माझ्या स्वतःवरचे आत्मचरित्रात्मक-लेख, मला मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्रे, काही महत्त्वाचे फोटो असा भरपूर मजकूर टाकलेला आहे. जवळपास दो  दोनशे पन्नास पेक्षा अधिक पोस्ट मी त्यावर टाकल्या आहेत.

माझ्या itthambhutbabaraomusale@blogspot या ब्लॉगला आतापर्यंत देशविदेशातील बारा हजारपेक्षा अधिक फालोअर्सनी भेटी दिल्या आहेत. आपणही निराशा टाळण्यायासाठी आणि भरपूर माहिती मिळविण्या साठी त्वरित माझ्या itthambhutbabaraomusale@blogspot या ब्लॉगला भेट द्या.

************************************************************Friday, January 20, 2012

म टा मधील नोंदीने छाती फुगली

म टा मधील नोंदीने  छाती फुगली 
            काव्याग्रह प्रकाशन वाशीमच्या  विष्णू जोशी यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या 'इथे पेटली माणूस- गात्रे' या काव्यसंग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार प्राप्त झाला त्या निमित्ताने म टा ने २० जानेवारी २०१२ च्या अंकात जी विशेष नोंद घेतली त्या मुळे माझी छाती  अभिमानाने फुलली.
      माझा कडूनच इतकी वर्षे उपेक्षित राहिलेली माझी कविता इतकी मोलाची  असेल ,असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत. ही कविता प्रकाशात आणणारे काव्याग्रहचे विष्णू जोशी, विठ्ठल जोशी ,तिला पुरस्कृत करणारी सहकार महर्षी मोहिते पाटील पुरस्कार समिती आणि या सगळ्यांची आवर्जून दाखल घेणाऱ्या म टा सह
महाराष्ट्रतील असंख्य  दैनिकांचा मी सदैव ऋणी राहीन .
        या संग्रहास श्री चक्रधर स्वामी वाचनालय शेवाळा(बाळापूर)तालुका कळमनुरी,जिल्हा हिंगोली यांचा मानाचा पुरस्कारही   जाहीर झाला आहे .

MAHARASHTRA TIMES CHI VISHESH NOND

माणसं 


गो. आ. भट
21 Jan, 2012, 0503 hrs IST, 
गो. आ. भट हे जातिवंत पत्रकार होते. प्रदीर्घ काळ महाराष्ट्र टाइम्समध्ये काम केलेल्या गो. आ. भटांकडे पत्रकाराकडे हव्यात अशा गोष्टी उदंड होत्या.

बाबाराव मुसळेबाबाराव मुसळे
21 Jan, 2012, 0501 hrs IST, 
बाबाराव मुसळे हे नाव मराठी साहित्य विश्वाला नवं नाही. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली.


बाबाराव मुसळे
21 Jan 2012, 0501 hrs IST
 
 प्रिंट  मेल  शेअर  सेव  प्रतिक्रिया फॉन्ट:

बाबाराव मुसळे हे नाव मराठी साहित्य विश्वाला नवं नाही. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली.

'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी 'पखाल'चं विशेष कौतुक केलं होतं. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झुंगु लुखू लुखू', 'मोहोरलेला चंद', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश' या कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या तर 'वारुळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात हलचल निर्माण केली. मात्र एव्हाना वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा मानाचा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चचेर्त आले.

खरंतर बाबाराव मुसळे यांच्यासाठी पुरस्कार आणि प्रसिद्धी नवी नाही. मात्र गेली अनेक वर्षं कादंबरी-कथा प्रांतात जोरकस मुशाफिरी करणाऱ्या मुसळे यांचं कवीतिक अंग आजवर रसिकांना फारसे उमगलेले नव्हते. वास्तविक कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची ही कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होत होती. मात्र ती आजवर पुस्तकरूपाने प्रकाशात न आल्यामुळे वाचक तीपासून अनभिज्ञ होते. परंतु 'काव्याग्रह प्रकाशन'च्या विष्णू जोशी यांनी अलीकडेच मुसळे यांच्या कवितेला प्रकाशनाची वाट दाखवली आणि या कवितेने कवितेचा गाभारा लख्खपणे उजळून टाकला.

मुसळे यांच्या गद्य लेखनावर यशस्वीतेची मोहोर उमटलेली होतीच. परंतु त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहालाही मानाचा साहित्यिक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी कवी म्हणूनही आता स्वत:ला सिद्ध केलं आहे. अर्थात हा त्यांच्या कवितेचा आणि त्यांनी त्या कवितेतून जो मानवतेचा धर्म जागवलाय त्याचा गौरव आहे. कारण त्यांची कविता केवळ स्वत:चं दु:ख जागवत नाही. ती समोरच्याचं दु:ख पाहूनही तेवढीच व्याकुळ होते. प्रसंगी पेटून उठते. एकूण मुसळे यांची कविता ही माणुसकीची कविता आहे आणि त्यांच्या कवितेचा झालेला गौरव हा माणुसकीचा गौरव आहे.

Thursday, December 8, 2011

६१ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे स्वग्ताद्यक्ष तसेच उद्घाटक

६१  व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे स्वग्ताद्यक्ष "मा. राधेश्याम्जी चांड",अध्यक्ष ,दि .बुलढाणा अर्बन को -ऑप. क्रेडीट सोसायटी म .बुलढाणा हे आहेत .
तसेच उद्घाटक म्हणून महासंग्नाकाचे जनक पदमश्री "डॉ.विजय भटकर "हे लाभणार आहेत .

Saturday, October 29, 2011

Monday, October 3, 2011

अहो आनंदम !

  अहो  आनंदम  ! 
मुंबईच्या प्रथितयश majestic प्रकाशनाने माझी ' आर्त ' नावाची कादंबरी स्वीकारली आहे .majestic  हे माझे मुंबईतले पहिले प्रकाशक आहेत . 
'आर्त ' चा विषय पश्चिम बंगाल मधल्या निम्न जमातीतील स्त्रियांच्या ,मुलींच्या अस्वस्थ शोषणाचा  आहे.गंगासागर यात्रेच्या काळात दर वर्षी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून १२ ते १५ वर्षे वयाच्या मुली  वेश्या  व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पळविल्या जातात .हाच या कादंबरीचा केन्द्रस्थ विषय आहे .तेथील लोकजीवन,संस्कृती ,भाषा ,निसर्ग इत्यादि घटक या कादंबरीत अवतीर्ण झाले आहेत .
मराठीतील  ही एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी असेल असा काही मान्यवरांचा प्रकाशनपूर्व अभिप्राय  आहे  .     

Thursday, September 29, 2011

संमेलन कार्यालयाचे उदघाटन

संमेलन कार्यालयाचे उदघाटन  आज  दिनांक २८ रोजी जिल्हा पोलीस  अधीक्षक मा. श्री .महादेवराव तांबडे साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न  झाले . 

६१वे विदर्भ साहित्य संमेलन वाशीम येथे २३ डिसेंबरला आहे.

६१वे विदर्भ साहित्य संमेलन वाशीम येथे २३,२४,२५ डिसेंबरला
आयोजक  (१)विढर्भ साहित्य संघ ,नागपूर
                 (२)विढर्भ साहित्य संघ शाखा ,वाशीम
                 (३)  सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ,वाशीम
स्थळ =        सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ,वाशीम


Monday, August 29, 2011

About me

 About me

A Novelist,story writer in rural literature in Marathi language ,poet, reviewer in Marathi literature.

My novels are=

(1)Halya halya dudhu de[1985-Mehta Publishing house,Pune-ph.-(24476924)/2008-2009 Bajaj Publications Amravati -ph.-(07212574396)]

(2)Pakhal [1994-Mehta publishing House-ph.(24476924)/2011 Bajaj Publications Amravati -ph.-(07212574396)]

(3) Varu[2004-08Saket Prakashan Aurangabad ,ph.-(02402332692)]

(4)Patilki[2005Pratibhas Prakashan Parbhani,ph.-(02452221710)]

  Review book-=
(1)Trutiyaratna(Mahatma Jyotibha Phule) Ani Halya Halya Dudhu de(Babarao Musale) edited by Dr. Tushar Chandwadkar(2010)

My story books are =

(1)Moharlela Chandra[1992-Mehta Publishing house,Pune-ph.-(24476924)]

(2)Zingu lukhu lukhu [1994-Mehta Publishing house,Pune- ph.-(24476924)]

(3)Nagar Bhojan[2009-Janshakti Vachak Prakashan Aurangabad,ph-(02406992050)].

My collection of poems is "Ithe Petli Manus Gatre "[Kavyagrah Prakashan Washim-ph.-(9623193480)].

My Novel " halya halya dudhu de" is selected in syllabus of B.A. part I in Pune(2009-10) & Nanded (2009-10)Universities and selected in syllabus of M.A. part I in Amravati(2010-11) & Kolhapur(2007-08) Universities.
"Pakhal"M.A. part I Amravati university(1998-99),
"Davnicha bail "(story)B.A. part II Amravati university(1991-2000)B.A. part I Aurangabad university(2007-08)
"Alpbhudharak"B.A. part II,B.com part I Amravati university (2007-08),
"Chatake" (story) B.A. part I Amravati university(2011-12)

Awards-   
(1)Maharashtra state Government 1995-96(Pakhal)
(2)Maharashtra state Government 2004-05(Varul)
(3)Rohmare award 1992( Moharlela Chandra)
(4)Lokmat Kamgar sahitya sammelan 1994 (Zingu lukhu lukhu)
(5)Vidharbh Sahitya sangh Nagpur,Jansahitya parishad Amravati ,Marathi anuvad parishad Buldhana,Padmagandha Nagpur,Date Wardha,Shabdpandhari Latur(Varul-2004-05).
(6) Vidharbha Sahitya sangh nagpur (Nagar bhojan-2009)
(7)"Life time Achievement Award "Chakradhar swami library,Shewala Tq-Kalamnuri Dist -Hingoli.
(8)"Life time Achievement Award " S.V.Pasarkar high school ,Kekat umra tq+Dist Washim(2011),
(9)Ideal Tearcher Award Maharashtra State Government 2002


President = 
(1)Ankur sahitya sammelan ,Malegao Dist -Akola (1985),
(2)Tisre gramin sahitya sammelan ,Shembalpimpri,Dist -Yavatmal(1988),
(3)Fifty-eighth Vidharbh sahitya sammelan ,Dhanora,Dist- Gadchiroli(19,20,21-December 2008)
(4) second Gajanan maharaj sahitya sammelan ,Risod ,Dist-Washim(28 December 2008)
(5)"Vidharbh Sahitya sangh Shakha Washim(from-May2011)


Member=
(1)Marathi Abhyas Mandal Amravati University (1987-90)
(2)Jhilha Saksharta Sarvasadharan Samiti (2006)
(3) Attended Fifth authors summit Lalit Bhavan Bhopa(september-1987)l.


Ph.D. Holders =
(1)Dr. Shivaji Nagre -Akola -09730036172(2)Dr. Doiphode -Sndkhedraja Dist -Buldhana-08806709327.


M.Phil Awarded= 
                           (A)"Halya halya dudhu de"=
                                      (1)Vitthal Lamkhede Pune
                                      (2)Prof. Munde Shendurjana Adhav ,Dist-Washim
                                      (3)Sharad Borade Mantha

                            (B)  "Varul"
                                       (1)Rajendra Lade ,Kolhapur
                                       (2)Pravin Chavhan ,Amravati
                                       (3)Dilip Adhe ,Latur
                                       (4)Prakash Meher ,Nagpur
                                       (5)Praful Wankhede ,Mangrulpir, Dist-Washim
                                       (6) Ku.Vidya Vhavhan ,Latur
                         (C)"Pakhal"=
                                        (1)Sau.Trupti Vishwambhare -Dhakhne
                           (D)"Patilki"=
                                         Prof.Gajanan Wagh -9881259466.